Shirur LokSabha | कोंढव्यातून सर्वाधिक मतदान करून आढळराव पाटलांना विजयी करणार, नगरसेवकांनी घेतली शपथ

Shirur LokSabha | गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आता काही दिवसात थंडावणार आहेत. यातच शिरूर लोकसभा (Shirur LokSabha) मतदारसंघात येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी प्रचारात चांगलाच जोर घेतला आहे.

यातच विकास भारत संकल्प याची जनजागृती करून घरोघरी प्रचार करून कोंढव्यातील नगरसेवक युद्ध पातळीवर काम करत आहेत. कोंढव्यातून सर्वात जास्त मतदान करून शिवाजी आढळराव पाटील यांना विजयी करणार, असे मत प्रभाग क्रमांक 27 चे सर्व नगरसेवक यांनी मांडले आहे. कोंढवा येथील जे के पार्क मौलाना युनुस गार्डन येथे आयोजित बैठकीत नगरसेवकांनी हे मत मांडले.

नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याकरिता हडपसर मतदार संघातील कोंढवा भागामध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीमध्ये आमदार चेतन तुपे पाटील, माजी नगरसेवक गफूर भाई पठाण, हाजी फिरोज शेख, माजी नगरसेवक रईस भाई सुंडके, हासिना आपा इनामदार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष समीर भाई शेख व अन्य नागरिक उपस्थित होते. विकसित भारत संकल्प या देशाच्या विकासासाठी शिरूर लोकसभेतून आढळराव पाटील हे विजय होतील असा विश्वास त्या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधींकडून व्यक्त करण्यात आला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Baramati Loksabha | पाणी प्रश्नावरून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चांगलीच खडाजंगी

Chandrakant Patil | पराभव समोर दिसत असल्याने संविधान बदलण्याची भाषा! चंद्रकांत पाटील यांचा कॉंग्रेसवर जोरदार प्रहार

Muralidhar Mohol | सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी मेट्रोचा विस्तार करणार