…नाहीतर वणवा पेटेल; निलेश राणे यांचा कर्नाटक सरकारला थेट इशारा

मुंबई : कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. व्हिडिओ वरून कोल्हापूरात शिवप्रेमींचा संताप अनावर झाला आहे.

शिवप्रेमींनी कानडी व्यवसायिकांना दुकान बंद करायला भाग पाडले आहे. कोल्हापुरातील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला आहे. शिवप्रेमी कडून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवण्यात येत आहे.

विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी कानडी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास सांगितले. बंगळुरुतील एक चौकतील हा पुतळा आहे, त्याची गुरूवारी रात्री विटंबना केली, त्याचे चित्रिकरण केले आणि तोच व्हिडिओ आज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. त्यामुळे शिवप्रेमी चांगलेच तापले आहेत.

महाराष्ट्रात देखील आता या संतापजनक घटनेचे पडसाद उमटत आहेत. माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ‘संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी नाहीतर वणवा लागेल.’ असा थेट इशारा निलेश राणे यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे.