Shivajirao Adhalarao Patil | शरदवाडी, वडनेर खुर्द गावांत जेसीबीतून पुष्पवृष्टी करत आढळराव पाटलांचे जल्लोषात स्वागत

शिरुर | महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्या प्रचारार्थ शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी पंचायत समिती गणामध्ये गावभेट दौऱ्याचे आयोजन केले होते. यावेळी शरदवाडी, वडनेर खुर्द गावांत आढळराव पाटील यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टि करुन तसेच ढोल-ताश्या व फटाके फोडून जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) म्हणाले की, “ही गावे माझी हक्काची गावे आहेत. या ठिकाणच्या माझ्या लोकांनी मला कायमच साथ दिली आहे. त्यामुळे या परिसरातून आपण मला चांगले मताधिक्य द्याल, या बाबत माझ्या मनात किंचिंतही शंका नाही.”

शरदवाडी, वडनेर अशा सर्वच ठिकाणच्या ग्रामस्थांनी आढळराव दादांना मोठे मताधिक्य देण्याचा शब्द यावेळी दिला. ढोल-ताशांच्या गजरात शिवाजीदादा यांचे स्वागत करण्यात आले. महिला व तरुणींनी आढळराव पाटील यांचे औक्षण केले. दरम्यान, यावेळी बोलताना आढळराव पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी कायमच कटीबद्ध असतो. माझ्याकडे आलेल्या प्रत्येकाचे काम करण्याचा प्रयत्न मी केला आहे. मंत्री दिलीपराव वळसे पाटील आजारी असले तरी त्यांचे सर्व मतदार संघातील बाबींवर बारकाईने लक्ष आहे. त्यामुळे आपण सर्वांनी पुढचे काही दिवस सक्रिय राहावे व आपले मताधिक्य जास्तीत-जास्त कसे वाढेल हे पाहावे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | गड किल्ल्यांचे संवर्धन करणार, मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन

Eknath Shinde | काँग्रेसने २६/११ हल्ल्यातील शाहिदांचा केलेला अपमान नकली हिंदुत्ववाद्यांना मान्य, शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Raj Thackeray In Pune | मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरे पुण्यात, ‘या’ दिवशी घेणार जाहीर सभा