Rohit Sharma | रोहित शर्माने CSK कडून खेळावे…! मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूची इच्छा

आयपीएल २०२४ पूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडून कर्णधारपद काढून घेत हार्दिक पांद्या याला नवा कर्णधार बनवले आहे. मुंबईच्या या निर्णयावर अनेक खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. आयपीएल २०२५ साठी मेगा ऑक्शन होणार असल्याचे कालच चेअरमन धुमाळ यांनी जाहीर केले होते. त्यामुळे रोहितने आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळावे, अशी इच्छा CSK व MIचा माजी खेळाडू अंबाती रायुडू याने व्यक्त केली आहे.

“मला रोहित शर्माने २०२५ मध्ये CSK कडून खेळताना पाहायला आवडेल, जर एमएस निवृत्त झाला तर रोहित चेन्नईचे नेतृत्व करू शकेल. रोहित (Rohit Sharma) अजूनही ५-६ वर्ष आयपीएल खेळू शकतो. जर त्याला कर्णधारपद हवं असेल, तर कोणतीही फ्रँचायझी त्याला सहज ही जबाबदारी देईल,”असे रायुडूने न्यूज २४ स्पोर्ट्सला सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Sharad Pawar | ‘दहा वर्षाच्या कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळात शरद पवार यांनी एकही शेतकरी हिताचे कार्य केले नाही’

Baramati Lok Sabha Elections | बारामतीमधील लढाई लक्ष्यवेधी ठरणार; अजितदादांच्या पुढच्या चालीकडे सर्वांचे लक्ष

Devendra Fadnavis | विकासपूरक धोरणामुळे २०४७ पर्यंत महाराष्ट्राची २ ट्रीलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल शक्य