Indian Cricket Team | आयसीसी कसोटी क्रमवारीत फेरबदल,भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकले

ICC Test Rankings Indian Cricket Team | भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 4-1 अशी जिंकली आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर टीम इंडियाने सलग चार कसोटी सामने जिंकून मालिका जिंकली. भारतासाठी युवा खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. आता आयसीसीने नवीन कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे, ज्यामध्ये टीम इंडियाला (Indian Cricket Team) फायदा झाला असून भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकून नंबर 1 बनला आहे. भारतीय संघाचे १२२ रेटिंग गुण आहेत. ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानावर असून त्याचे ११७ रेटिंग गुण आहेत. याशिवाय टॉप-10 मध्ये कोणताही बदल झालेला नाही. मात्र आयरिश संघाला एका स्थानाचा फायदा झाला आहे. संघ 11 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयर्लंडचे 10 रेटिंग गुण आहेत. तर अफगाणिस्तानला एक स्थान गमवावे लागले असून अफगाणिस्तानचा संघ १२व्या क्रमांकावर आहे.

गेल्या आठवड्यात, अफगाणिस्तान आणि आयर्लंड क्रिकेट संघ यांच्यात कसोटी सामना खेळला गेला, ज्यामध्ये आयर्लंडने अफगाणिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा आयर्लंडचा पहिला विजय आहे. आयर्लंडकडून मार्क एडेअरने चमकदार कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात तीन बळी घेतले. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

लोकसभेच्या निवडणुकीत माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईन – Pankaja Munde

तुम्ही ज्या जागा जिंकू शकणार नाहीत, त्याच मविआ तुम्हाला देत आहे- Nitesh Rane

खोट्या शपथा घेऊन आई तुळजाभवानीचा अपमान करू नका; Chandrashekhar Bawankule यांचा पलटवार