IPL आणि WPL फायनलमध्ये असे योगायोग तुम्हीही म्हणाल सेम टू सेम! कॅप्टन, टॉस, स्कोअरकार्ड ते निकाल

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) 17वा हंगाम संपला आहे. 26 मे (रविवार) रोजी झालेल्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने सनरायझर्स हैदराबाद (SRH) चा 8 गडी राखून पराभव केला. यासह केकेआरने तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. याआधी त्यांनी 2012 आणि 2014 च्या मोसमातही विजेतेपद पटकावले होते. तर सनरायझर्स हैदराबादचे दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले.

आयपीएल 2024 चा अंतिम सामना पाहून चाहत्यांना महिला प्रीमियर लीग (WPL) 2024 च्या अंतिम सामन्याची आठवण झाली. दोन्ही सामन्यांमध्ये काही साम्य होते जे जाणून तुम्हाला धक्का बसेल…

1. IPL 2024 च्या फायनलमध्ये एका संघाचा कर्णधार भारतीय (श्रेयस अय्यर) होता, तर दुसऱ्या संघाचा कर्णधार ऑस्ट्रेलियन (पॅट कमिन्स) होता. WPL 2024 च्या फायनलमध्येही असेच घडले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार मेग लॅनिंग दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार होती, तर भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कर्णधार होती.

2. WPL 2024 च्या अंतिम सामन्यात, ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने (Meg Lanning) नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये देखील ऑस्ट्रेलियन कर्णधार (पॅट कमिन्स) ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

3. WPL 2024 च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघ 18.3 षटकात 113 धावांवर बाद झाला. तर आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा संघही 18.3 षटकात 113 धावांवरच मर्यादित राहिला. म्हणजेच, दोन्ही फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने समान संख्येने धावा केल्या आणि समान चेंडूही खेळले.

4. WPL 2024 च्या फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आठ विकेट्स राखून विजय मिळवला. तर आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने आठ गडी राखून विजय मिळवला.

5. भारतीय कर्णधार (स्मृती मानधना) ने WPL 2024 मध्ये ट्रॉफी उचलली. आयपीएल 2024 मध्येही फक्त भारतीय कर्णधाराने (श्रेयस अय्यर) ट्रॉफी उचलली होती.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप