Kalyaninagar Accident News | कल्याणीनगर अपघात प्रकरणात ससून रुग्णालयाच्या शिपाहीला अटक, ब्लड सँपल बदलण्यासाठी पुरवले पैसे

पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी (Kalyaninagar Accident News) ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना रक्ताचे नमूने बदलण्याच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या व्यवहारात ससून हॉस्पिटलचा शिपाही अतुल घटकांबळे याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. अतुल घटकांबळेने ब्लड सँपल बदलण्यासाठी पैसे पुरवल्याचा आरोप आहे. वडगाव शेरीतून एका स्विफ्ट कारमधून घटकांबळेने तीन लाख रुपये आणले होते.
पुणे पोलिसांनी या इसमाला अटक केली आहे.

ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक
कल्याणीनगर येथील अपघाताला (Kalyaninagar Accident News) कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला रविवारी वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यातील ससून सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी मुलाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना पैशांचे आमिष दाखविले. डॉक्टर अजय तावरे हे ससुन रुग्णालयाच्या forensic medicine and toxicology चे प्रमुख आहेत तर डॉक्टर श्रीहरी हळनोर हे अपघात विभागात चीफ मेडिकल ओफिसर आहेत. त्या मुलाचे ब्लड सॅम्पल श्रीहरी हळनोर यांच्या विभागानं घेतले मात्र त्यामध्ये दारूचा अंश येऊ शकतो, हे लक्षात आल्यावर ते बदलायचे ठरवले. त्यासाठी रजेवर असलेल्या डॉक्टर अजय तावरे यांनी हस्तक्षेप केला. खरं तर डॉक्टर अजय तावरे हे गेल्या काही दिवसांपासून रजेवर आहेत. मात्र तरीही तावरे यांनी ब्लड सँपल बदलायला सांगितले. त्यानंतर दुसऱ्याच एका रुग्णाचे ब्लड सँपल टेस्टिंग साठी देण्यात आले. मात्र पुणे पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने आणखी एका लेबला पाठवून DNA टेस्ट करायचं ठरवलं आणि डॉक्टरांचं बिंग फुटलं.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप