जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे जीवनाची लढाई हरले,भाषणादरम्यान झाला होता गोळीबार

Tokio – जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Former Prime Minister of Japan Shinzo Abe) अखेर आयुष्याची लढाई हरले. जपानी मीडियाच्या हवाल्याने मिळालेल्या वृत्तानुसार, शिंजो आबे यांच्या छातीत  गोळी लागली होती. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला होता. अखेर काही तासांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू (Death)  झाला.

गोळी झाडल्यापासून त्यांची प्रकृती खालावत चालली होती. डॉक्टर त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत होते, तरीही त्याच्यात काही सुधारणा दिसली नाही. आबे यांच्या हृदयासह अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते. अखेर काही तासांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, शिंजो आबे यांना सकाळी नारा शहरात (city of Nara) गोळ्या घालण्यात आल्या. भाषण देताना ते अचानक कोसळले. त्याच्या छातीत गोळी लागल्याचे अहवालात बोलले जात आहे. गोळी लागल्याने शिंजो आबे यांना हृदयविकाराचा झटका (Heart attack) आला होता.