बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे खरे वारसदार एकनाथ शिंदेच – देवेंद्र फडणवीस

Mumbai – बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) शिवसेनेचे खरे वारसदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच आहेत, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे केवळ कौटुंबिक वारसदार आहेत, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यावर शिवसेनेकडून अधिकृतरित्या प्रतिक्रिया आली नसली, तरी सोशल मीडियावर शिवसेना समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्वीट करत म्हटलं की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर ठामपणे उभी राहणारी शिवसेना (Shivsena)  ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. पारिवारिक वारसा हा उद्धव ठाकरे यांच्याकडे असला तरी वैचारिक वारसा (Ideological heritage) सुद्धा महत्त्वाचा असतो. हा वैचारिक वारसा घेऊन एकनाथ शिंदे पुढे जात आहेत, असंही फडणवीस म्हणाले.