Vijay Shivtare : सुनेत्रा पवारांना फक्त उमेदवारी मिळाल्यावर किती बदल झाला, खासदार झाल्यावर तर काय होईल?

Vijay Shivtare : एकेकाळचे कट्टर विरोधक असलेले शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay shivtare) सध्या सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) विजयी करण्यासाठी मोठ मोठ्या बैठका घेतांना दिसत आहेत. अशातच आता नसरापुर येथे सुनेत्रा पवार यांच्यासाठी विजय शिवतारे मोठी सभा घेत असल्याची माहिती त्यांनी दिलीय. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणार असल्याचीही माहिती शिवतारे यांनी दिली आहे.

यावेळी शिवतारे म्हणाले की, उद्या संध्याकाळी नसरापुर येथे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सभा होत आहे. त्याचसंदर्भात भोर वेल्हा आणि मुळशीच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती. जशी ११ तारखेला सासवड सभा झाली होती. तशीच सभा होत आहे. या सभेला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणार आहेत. अशातच आता भोर मतदारसंघात कुलदीप कोंडे आल्याने तेथील वातावरण अगदीच उल्हासित झालं आहे. असेही विजय शिवतारे म्हणाले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, सुनेत्रा पवार यांचं पायगुण चांगला आहे. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपुर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात प्रश्न मांडायला सुरूवात केली आहे. येत्या अधिवेशनात त्या सगळ्याबाबत निर्णय घेतील, असा विश्वास आहे. यातच सुनेत्रा पवारांना फक्त उमेदवारी जाहीर झाली आहे. तर किती बदल झाला आहे. तर विचार करा खासदार झाल्यात तर काय होईल. ? असा विश्वास देखील विजय शिवतारे यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, रोहितच्या नेतृत्वाखाली खेळणार हार्दिक पांड्या

Anis Sundke | हा देश जितका हिंदूंचा तितकाच मुलमानांचा सुद्धा, अनिस सुंडके यांचे प्रतिपादन

शिवसेना शिंदे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून रविंद्र वायकर यांना उमेदवारी