Josh Baker | दु:खद! इंग्लंडचा उगवता सितारा हरपला, वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी घातक फिरकीपटूचे निधन

Josh Baker | इंग्लंडचा घातक फिरकीपटू जोश बेकर याचे निधन झाले. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी त्यानेअखेरचा श्वास घेतला. वोस्टरशायरने बेकरच्या मृत्यूची पुष्टी केली. मात्र, त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेमुळे क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बेकरचा त्याच्या वाढदिवसाच्या अवघ्या 14 दिवस आधी मृत्यू झाला. तो 16 मे रोजी 21 वा वाढदिवस साजरा करणार होता.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला
जोश बेकर (Josh Baker ) याच्या अकाली निधनाने सर्वांना धक्का बसला आहे, असे वूस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबच्या वतीने सांगण्यात आले. क्लबचे मुख्य कार्यकारी ॲशले जाईल्स यांनी दुःख व्यक्त करताना म्हटले, “जोशच्या निधनाच्या बातमीने आम्हा सर्वांना दुःख झाले आहे. जोश हा एक सहकारी होता, तो आमच्या क्रिकेट परिवाराचा अविभाज्य घटक होता. आम्हा सर्वांना त्याची खूप आठवण येईल. आमचे सर्व प्रेम आणि प्रार्थना.”

जाईल्स पुढे म्हणाले, “या अत्यंत कठीण काळात जोशच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि सहकाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी क्लब समर्पित आहे. आम्ही आमच्या दुःखात एक आहोत आणि त्याच्या स्मृतीचा आदरपूर्वक वागणूक देण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.”

तीन वर्षांच्या कारकिर्दीत 70बळी घेतले
2003 मध्ये जन्मलेला बेकर वूस्टरशायरकडून काउंटी क्रिकेट खेळायचा. 2021 मध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने या फॉरमॅटमध्ये एकूण 22 सामने खेळले. याशिवाय त्याने 17 लिस्ट ए आणि आठ टी-20 सामनेही खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे 43, 24 आणि तीन विकेट घेतल्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ramdas Athawale | कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही, रामदास आठवलेंची ग्वाही

Ravindra Dhangekar | आता जनतेला अंधे, मुके आणि बहिरे सरकार नकोय, धंगेकर यांची मोदीं सरकरावर टीका

Devendra Fadnavis | …तुम्ही कफन चोर आहात, देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल