Shirur Loksabha Election Results | अजित पवार म्हणाले, कसा निवडून येतो बघतोच, अमोल कोल्हेंनी विजय खेचून आणला

अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या शिरुर लोकसभा मतदारसंघाचा निकाल (Shirur Loksabha Election Results) समोर आला आहे. शिरुरच्या जनतेने प्रचारादरम्यान ज्या अमोल कोल्हेंची कानउघडणी केली होती, त्यांनाच पुन्हा एकदा संधी दिली आहे. शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी मोठ्या मताधिक्यासह दुसऱ्यांदा विजयाचा गुलाल उधळला आहे. तर महायुतीचे उमेदवार व अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.

अमोल कोल्हेंच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि आजित पवार गट असे दोन गट पडले. त्यात शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना खासदारकीसाठी संधी देण्यात आली. मात्र, अजित पवार गटाला उमेदवार मिळत नव्हता. त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर अजित पवारांनी लोकसभा उमेदवारी जाहीर (Shirur Loksabha Election Results) झाल्यानंतर कसा निवडून येतो बघतोच, असा सज्जड दम अमोल कोल्हेंना दिला होता. अमोल कोल्हे यांनी हे आव्हान स्विकारलं होतं. आता लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी विजय मिळवल्यामुळे अजित पवार तोंडघशी पडले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप