पुण्यातील शाळाबाबत महत्वाची बातमी

पुण्यातील शाळा 1 डिसेंबर रोजी उघडणार होत्या पण अचानक कोरोनाचा नवीन हेरियंट समोर आल्यामुळे शाळा सुरू होण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. पण आता मात्र महापालिकेने नुकतीच एक घोषणा केली आहे, पुण्यातील शाळा 16 डिसेंबर पासून सुरू होणार आहेत. अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पहिली ते सातवी पर्यतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

मुंबईतील शाळा उद्या पासून सुरू होणार आहेत. यापूर्वी देखील शाळा सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली होती. पण अचानक त्या निर्णयास स्थिगिती देण्यात आली होती. मात्र आता पालकांनी मनात कोणतीच शंका न ठेवता मुलांना शाळेत पाठवावे, असे निवेदन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जाहीर केले आहे.