नरेंद्र मोदींनी शीख नेत्यांशी साधला संवाद, म्हणाले, देश १९४७ जन्माला नाही तर ..;

नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी येत्या रविवारी मतदान होत आहे. या निवडणुकीपर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी वरिष्ठ शीख नेत्यांची भेट घेतली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, भारताचा जन्म हा फक्त १९४७ मध्ये झाला नाही. त्यामुळे पंजाब मध्ये आणीबाणीच्या विरोधात सत्याग्रह झाला होता. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीख नेत्यांच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, हा देश १९४७ मध्ये जन्माला आलेला नाही. त्यावेळी पंजाबमध्ये आणीबाणीच्या विरोधात मोठा सत्याग्रह झाला होता. तसेच त्यावेळी मी भूमिगत होतो. लपण्यासाठी मी शीख म्हणून वेश देखील धारण केला होता. तसेच मी पगडीही घालत असे.

शीख समुदायाला डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाच्या फाळणीच्या वेळी १९४७ नंतर कॉंग्रेस करतारपुर साहिब गुरुद्वारा भारतात ठेवण्यात अपयशी ठरली. त्यामुळेच आता करतारपुर साहिब गुरूद्वारा पंजाब पासून ६ किलोमीटरवर पाकिस्तानमध्ये आहे.

काँग्रेस केवळ 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या करतारपूरचे भारतात विलीनीकरण करण्याचा करार करू शकले नाही. मी राजनैतिक मार्गाने त्यांच्याशी बोलणे सुरू केले. जेव्हा मी पंजाबमध्ये राहत होतो, तेव्हा मी दुर्बिणीच्या माध्यमातून कर्तारपूर साहिबला पाहायचो. त्यावेळेस मला वाटायचे की आपण काहीतरी केले पाहिजे. त्यामुळेच गुरुंच्या कृपेने आम्ही हे पवित्र कार्य करू शकलो. एवढ्या कमी वेळात जे काम केले ते फक्त तुमच्या विश्वासामुळेच शक्य झाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी अफगाणिस्तानातून गुरु ग्रंथसाहिब आदरपूर्वक परत आणल्याचाही उल्लेख केला.