INDvsAFG: भारताचा रोमहर्षक विजय, दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकत मालिका घातली खिशात

IND vs AFG:- बेंगलोर येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्यात झालेला तिसरा टी 20 सामना चित्तथरारक राहिला. भारताने प्रथम फलंदाजी करताना चार विकेटच्या मोबदल्यात 212 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल अफगाणिस्तान संघानेही 20 षटकात 6 विकेट्सच्या मोबद्लायत 212 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी 16 धावा केल्याने दुसऱ्यांदा सुपर ओव्हर झाली. अखेर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताने विजय मिळवत ३ सामन्यांच्या टी20 मालिकेत अफगाणिस्तानला क्लिन स्वीप दिला.

भारताने दिलेल्या 213 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने सडेतोड उत्तर दिले. अफगाणिस्तान संघाने 20 षटकात 6 विकेटच्या मोबदल्यात 212 धावा करत बरोबरी केली. गुरबाज आणि जादरान यांनी 11 षटकात 93 धावांची सलामी दिली. दोघांनीही अर्धशतके ठोकली. गुरबाद याने 21 चेंडूत अर्धशतक ठोकले. यामध्ये चार षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता. तर जादरान याने एक षटकार आणि 4 चौकाराच्या मदतीने 50 धावा केल्या. दुलबादीन नैब याने अवघ्या 23 चेंडूत 55 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये चार चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. मोहम्मद नबी यानेही 16 चेंडूत 34 धावांचं योगदान दिले. यामध्ये तीन षटकारांचा समावेश होता.

अखेरच्या षटकात अफगाणिस्तान संघाला विजयासाठी 19 धावांची गरज होती. गुलाबदीन याने 18 धावा वसूल करत सामना बरोबरीत सोडला. भारताकडून मुकेश कुमार याला अखेरच्या षटकात 19 धावांचा बचाव करण्यात अपयश आले.

दरम्यान, रोहित शर्माचं वादळी शतक आणि रिंकूंच्या विस्फोटक अर्धशतकाच्या बळावर भारताने 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 212 धावांचा डोंगर उभारला. रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमधील पाचवे शतक ठोकले तर रिंकू याने पुन्हा एकदा अर्धशतकी तडाखा दिला. अफगाणिस्तानकडून फरीद याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्त्वाच्या बातम्या-

नितेश तिवारीच्या ‘रामायण’मध्ये बॉबी देओल कुंभकर्णाच्या भूमिकेत दिसणार? जाणून घ्या सत्य

‘हे’ आहेत जगातील सर्वोत्तम तांदूळ, तांदळाची ‘ही’ भारतीय जात पहिल्या क्रमांकावर

अरे हे काय? इशानसाठी देशापेक्षा IPL महत्त्वाचे! मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी टीम इंडियातून बाहेर

Sharad Mohol : शरद मोहोळ प्रकरणात अटकेत असणारा विठ्ठल शेलार नेमका कोण आहे?