Irfan Pathan | धक्कादायक! इरफान पठाणचा मेकअप आर्टिस्ट फैयाज अन्सारीचा स्विमिंगपूलमध्ये बुडून मृत्यू

क्रिकेटविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण (Irfan Pathan) याचा मेकअप आर्टिस्ट फैयाज अन्सारीचा स्विमिंगपूलमध्ये पोहताना बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. फैयाज अन्सारीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनूसार तो इरफान पठाणसोबत वेस्ट इंडिजला गेला होता. इरफान पठाण फैयाजचा मृतदेह भारतात पाठवण्याचा खर्च करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

सध्या टी-20 विश्वचषक 2024 ची स्पर्धा वेस्ट इंडिजमध्ये सुरु आहे. भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण ( Irfan Pathan) सध्या टी-20 विश्वचषकात समालोचनाची भूमिका बजावत आहे. इरफानसोबत त्याचा मेकअप आर्टिस्टही वेस्ट इंडिजला गेला होता. यादरम्यान शुक्रवारी संध्याकाळी एका हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पोहताना फैयाजचा मृत्यू झाला, अशी माहिती मृत फैयाज अन्सारीचा चुलत भाऊ मोहम्मद अहमद यांनी दिली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

मविआचा पुण्यासाठी जागा वाटपाचा फॉर्मूला ठरला! ठाकरेंना २ तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस इतक्या जागा लढणार

Chhagan Bhujbal : इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कुठल्याही परिस्थितीत धक्का लागणार नाही, भुजबळ यांची ग्वाही

Pune Accident: पोर्श कार अपघाताची पुनरावृत्ती! पुण्यात आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला उडवले