Seema Haider: मुलांचे धर्मांतर कसे केले? सीमा हैदर हिला पाकिस्तानातील पतीकडून 11 कोटींची नोटीस

Seema Haider :  पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) आणि तिचा भारतीय पती सचिन मीणा (Sachin Meena) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सीमा हैदरच्या पाकिस्तानातील पतीने दोघांना नोटीस पाठवली असून या नोटीसमधून सीमा हैदर हिच्याकडे तब्बल ११ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तसेच, या नोटीसमध्ये मुलांचा धर्म कसा बदलला? अशी विचारणाही करण्यात आलीय.

वकील मोमीन मलिक यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये अल्पवयीन मुलांचा धर्म कसा बदलला?, अशी विचारणा करण्यात आली आहे. कायद्यानुसार, जर तुम्हाला तुमचा धर्म बदलायचा असेल तर तुम्हाला त्याची माहिती द्यावी लागेल. यामध्ये मुलांच्या वडिलांचा सल्ला महत्त्वाचा आहे. ही प्रक्रिया का पाळली गेली नाही, अशी विचारणा नोटीसमध्ये करण्यात आली आहे. सीमा हैदर हिचा मानलेला भाऊ आणि त्यांचे वकील एपी सिंग यांना ५ कोटी रुपयांची अवमान नोटीस बजावण्यात आली आहे. सीमा हैदर आणि गुलाम हैदर यांच्या चार मुलांचे चुकीच्या पद्धतीने धर्मांतर करण्यात आले आहे. एक तर महिनाभरात माफी मागा नाहीतर ५ कोटी रुपये द्यावे लागतील.

सचिनला ३ कोटींची नोटीस
सीमा हैदरचा भारतीय पती सचिन मीना याला ३ कोटी रुपयांची नोटीस पाठवण्यात आली आहे. हैदरने पाकिस्तानातून अवैधरित्या भारतीय सीमा ओलांडली आहे. सीमा हैदर हिला सचिन मीणा कशाच्या आधारावर पत्नी म्हणत आहे? सचिनने सीमा हैदरला आपल्या शब्दांचे आमिष दाखवून भारतात बोलावले आहे. सीमा हैदर हिने पती गुलाम हैदरला घटस्फोट न देता सचिनसोबत लग्न केले आहे. हे कायदेशीर नाही. त्यामुळे सीमा हैदर हिला तीन कोटी रुपयांची नोटीस बजावण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Congress | कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्याच्या कन्येने केला भाजपमध्ये प्रवेश

Congress | ‘महंगाई डायन’ म्हणणाऱ्या भाजपाला आता तीच ‘महंगाई डार्लिंग’ वाटू लागली आहे का? काँग्रेसचा सवाल

तुम्हाला सन्मानाचं पद देऊ,ठाकरेंनी नितीन गडकरींना ऑफर दिल्यानंतर आता सुधीर मुनगंटीवारांची ठाकरेंना ऑफर