महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी युपीत मराठी शिकवा; कृपाशंकर सिंह यांचे CM योगींना पत्र

मुंबई – भाजप नेते कृपाशंकर सिंह (BJP leader Kripashankar Singh)  यांच्या पत्रामुळे आणखी नवा वादा निर्माण होण्याची शक्यता आहे. कृपाशंकर सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) उत्तर प्रदेशतल्या शाळांमध्ये मराठी (Marathi ) शिकवण्याची विनंती केली आहे. मात्र, हे पत्र मराठीच्या प्रेमामुळे नव्हे तर उत्तर प्रदेशातील तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी सोपं जावं यासाठी मराठी शिकवण्याची मागणी केली आहे.

कृपाशंकर सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून मराठी विषय पर्यायी म्हणून शिकवण्याची विनंती केली आहे. उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना मराठी आल्यास त्यांना महाराष्ट्रात चांगली नोकरी उपलब्ध होऊ शकेल असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना मराठी शिकवण्याची मागणी कृपाशंकर सिंह यांनी केली आहे.

कृपाशंकर सिंह यांनी लिहिलेल्या पत्रावर उत्तर प्रदेश सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रायोगिक तत्वावर हा वाराणसीमध्ये मराठी विषय शिकवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.