IPL Trophy | आजारी आई म्हणाली आयपीएल ट्रॉफीशिवाय काहीही नको; केकेआरच्या मॅच विनरने सांगितला भावनिक किस्सा

IPL Trophy | शाहरुख खानच्या चित्रपटातील एक डायलॉग आहे; इतनी शिद्दत से मैंने तुम्हे पाने की कोशिश की है, की हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है! ही ओळ त्याच्या संघाला आणि एका खेळाडूला लागू होते. सर्वप्रथम, आईच्या आजारपणामुळे त्या खेळाडूला आयपीएलच्या मध्यावर मायदेशी परतावे लागले. त्यानंतर नशिबाने चाल खेळली आणि त्याला भारतात परत आणले.

होय, आम्ही बोलत आहोत अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज रहमानउल्ला गुरबाजबद्दल. आईच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो आयपीएलमधून मध्यंतरी घरी परतला. नशिबाचा खेळ बघा, फिल सॉल्ट पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी इंग्लंडला गेला होता. दुसरीकडे, गुरबाजच्या आईच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तो कोलकाता संघात पुन्हा सामील झाला.

गुरबाज आपल्या आजारी आईला रुग्णालयात सोडून भारतात परतला
रहमानउल्ला गुरबाज आयपीएल लीग स्टेजच्या शेवटी त्याच्या आजारी आईला रुग्णालयात सोडून परतला. राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना पावसामुळे वाहून गेल्याने त्यांना प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी मिळाली. गुरबाजने फायनलमध्ये 39 धावांची इनिंग खेळली होती. फायनलपूर्वी गुरबाजचे आईशी फोनद्वारे बोलणे झाले होते. गुरबाजने फोनवर आईला काय हवे आहे, असे विचारले होते. आई विजयशिवाय काहीच बोलली नव्हती. आयपीएल चॅम्पियन ( IPL Trophy) झाल्यानंतर गुरबाजने हा भावनिक संवाद उघड केला.

गुरबाजने त्याच्या आईसोबत झालेल्या संवादाचा किस्सा सांगितला.
सामन्यानंतर गुरबाज म्हणाला, मला वाटते की तिने फायनल पाहली आबे, ती आता ठीक आहे. सामन्याच्या आधी मी आईशी बोललो, मी विचारले तुला काय हवे आहे? ती म्हणाली, विजयाशिवाय काहीही नाही. सॉल्ट गेल्यानंतर मला संधी मिळाली आणि मी त्यासाठी तयार झालो. मी दोन वेळा आयपीएल चॅम्पियन आहे. मी भाग्यवान आहे. जेव्हा तुम्ही 2 महिने कठोर परिश्रम करता आणि असे परिणाम मिळतात, ते विशेष आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप