अतिक अहमदचा पाकिस्तानला आला पुळका; शाहबाज गिल म्हणाले, हा तर लोकशाहीसाठी काळा दिवस 

Atique-Ahmed-murder :  प्रयागराजचा माफिया अतिक अहमदचा खुनी खेळ आता संपुष्टात आला आहे. 44 वर्षांची माफियागिरी अवघ्या काही सेकंदात संपुष्टात आली. अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफवर शनिवारी रात्री प्रयागराज येथील रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले जात असताना हल्लेखोरांनी अचानक दोन्ही भावांवर जीवघेणा हल्ला केला आणि पाहताच गोळीबार केला.

या हल्ल्यात अतिकला प्रथम गोळी लागली. अश्रफला काही समजण्यापूर्वीच हल्लेखोरांनी त्याच्यावरही गोळ्या झाडल्या. हा सर्व प्रकार अवघ्या काही सेकंदात घडला. ४४ वर्षीय अतीक अहमदचा माफिया काही सेकंदात संपुष्टात आला. अतिक अहमद हत्येचे राजकीय पडसाद केवळ देशातच नाही तर सीमेपलीकडे पाकिस्तानतून देखील पडताना पाहायला मिळत आहे.

पाकिस्तानी सरकारच्या एका प्रभावशाली नेत्याने या हत्याकांडावर विषारी वक्तव्य केले आहे. शाहबाज गिल यांनी या मुद्द्यावरून भारताविरोधात विष ओकले आहे. त्यांनी ट्विटमध्ये व्हिडिओ शेअर करत ‘भारताच्या लोकशाहीसाठी लाजिरवाणा दिवस’ असे लिहिले आहे. माजी खासदार अतिक अहमद आणि त्यांचा भाऊ अश्रफ यांची पोलिस कोठडीत कॅमेऱ्यांसमोर हत्या करण्यात आली. पूर्वनियोजित हत्या. अल्पसंख्याक मुस्लिमांवर दररोज प्राणघातक हल्ले होत आहेत असं त्यांनी म्हटले आहे.