‘संजय राऊतांच्या तोंडाला साप चावायला पाहिजे होता’, शिंदे गटातून खोचक प्रतिक्रिया

Mumbai: ठाकरे गटाचे खासदार आणि रोखठोक वक्तव्य करणारे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या बंगल्यात साप आढळल्याने एकच खळबळ उडाली. संजय राऊत आज दुपारी त्यांचे निवासस्थान मुंबईतल्या भांडुप येथे पत्रकार परिषद घेत होते. या पत्रकार परिषदेदरम्यान हा साप दिसल्याने सर्वत्र गोंधळ उडाला.

तो साप संजय राऊत यांच्या दिशेने चालला होता. सुरक्षा रक्षकांना ही माहिती मिळताच त्यांनी सापाला हुसकवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो जात नव्हता. त्यानंतर सर्पमित्रांना बोलवण्यात आलं. सर्पमित्र या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी या सापाला पकडलं आणि नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं. पाणदिवड जातीचा हा बिनविषारी साप होता. या सापाला पकडल्यावर उपस्थित असलेल्या सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे.