Ajit Pawar | भटकत्या आत्म्याचं नाव काय ते मोदींनाच विचारुन सांगतो, शरद पवारांवरील टीकेवर अजितदादांचे वक्तव्य

Ajit Pawar | पुणे जिल्ह्यातील बारामती, पुणे, मावळ, शिरुर लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जाहीर सभा घेतली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. मोदींनी पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला. मोदींनी शरद पवारांचे नाव न घेता ही टीका केली. मात्र त्यांचा रोख शरद पवारांकडेच होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मोदींच्या ‘अतृप्त आत्मा’ या टीकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

“पंतप्रधान नेमकं कोणाबद्दल बोलले ते माहिती असायला मी काही ज्योतिषी नाही. त्यांच्या मनात नक्की कोण ते… त्याबाबतीत मी पुढच्या सभेत मोदींना विचारेन… आमची पुढची प्रचारसभा जिथे असेल आणि तिथे मीदेखील असेन तर मी तेव्हा मोदींना त्या वक्तव्याबाबत विचारेन. भटकत्या आत्म्याचं नाव काय तेदेखील विचारेन. त्यांनी नेमका कोणत्या उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे वक्तव्य केलं त्याबाबतही विचारेन. त्यांनी मला नाव सांगितलं की मी ते तुम्हाला सांगेन”, असं अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मोदींच्या नेतृत्वात भारत बनेल तिसरी मोठी अर्थव्यवस्था, मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

Eknath Shinde | ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा त्याचा उबाठाला अभिमान वाटतोय

Narendra Modi | ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कर्नाटकी कट हाणून पाडा, पंतप्रधान मोदींचे आवाहन