Faf du Plessis | “आज रात्री आम्हाला चांगली झोप लागेल”, एका महिन्याने विजयाची चव चाखल्यामुळे फाफ डू प्लेसिस झाला खूश

Faf du Plessis | आयपीएल 2024 चा 41 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB ) यांच्यात झाला. बरोबर एक महिन्यानंतर, आरसीबीला या हंगामात दुसरा विजय मिळाला. आरसीबीला 25 मार्चला पहिला विजय मिळाला होता, आता त्यांचा दुसरा विजय 25 एप्रिलला झाला. या विजयानंतर कर्णधार फाफ डु प्लेसिसने (Faf du Plessis) आनंद व्यक्त केला.

हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात आरसीबीने (RCB ) प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली (51) आणि रजत पाटीदार (50) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 206 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला 8 गडी गमावून केवळ 171 धावा करता आल्या. बेंगळुरू 35 धावांनी जिंकला. आरसीबीचा हा दुसरा विजय आहे. या विजयासह आरसीबीला अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा आहेत.

‘आज रात्री आम्हाला आरामात झोप लागेल’
सामन्यानंतर फाफ डुप्लेसिस म्हणाला की, आम्ही गेल्या दोन सामन्यांमध्ये लढलो. जवळपास सामना हरलो. आत्मविश्वास मिळवण्यासाठी तुम्हाला सामने जिंकणे आवश्यक आहे. आज रात्री आम्ही आरामात झोपू. तुम्ही संघातील आत्मविश्वासाबद्दल बोलू शकत नाही, तुम्ही संघात आत्मविश्वास असल्याचे ढोंग करू शकत नाही. आत्मविश्वास देणारी एकमेव गोष्ट म्हणजे कामगिरी. असे फाफ म्हणाला.

स्पर्धेत स्पर्धा चुरशीची झाली आहे
फाफ पुढे म्हणाला, स्पर्धा खडतर आहे, संघ इतके मजबूत आहेत की, तुम्ही 100 टक्के दिले नाही तर तुमचे नुकसान होईल. आता संघात जास्त लोक धावा करत आहेत. स्पर्धेच्या पूर्वार्धात फक्त विराट धावा करत होता. आता धावा करणे ही ग्रीनसाठी मोठी गोष्ट असेल. आगामी सामन्यांमध्ये आणखी चांगली कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न असेल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | मोहोळ प्रचंड मताने निवडून येतील, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

Shivajirao Adhalarao Patil | राऊतांसारखी कोल्हेंनी सकाळी उठून काहीही बडबड करू नये, आढळरावांनी का साधला निशाणा?

Amol Kolhe | केंद्रातील सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेष, अमोल कोल्हेंचा सूतोवाच