Ravindra Dhangekar | उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या कोथरूडमधील सभेवरुन काँग्रेसमध्ये वाद, रवींद्र धंगेकरांपुढे पेच

महाविकास आघाडीचे कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची कोथरूड मध्ये सभा घेण्यावरून कॉंग्रेसमध्येच वाद झाल्याचे समोर आले आहे. ठाकरे यांची कोथरूडमध्ये जाहीर सभा झाली तर आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाकडून जागांची मागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरेंची सभा कोथरूडमध्ये होऊ नये, असा काही कॉंग्रेसच्या नेत्यांची मागणी असल्याचं समोर आलं आहे.

रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचारानिमित्ताने महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या सभा, रोड, शो, मेळाव्यांचे नियोजन सुरू आहे. यानिमित्ताने कॉंग्रेस भवनात गुरूवारी रात्री कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची किंवा आदित्य ठाकरे यांची सभा घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र या मागणीवरून कॉंग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा वाद झाला. सभा झालीतच तर कोथरूड विधानसभेवर देखील ठाकरे गटाकडून दावा केला जाईल. त्याचबरोबर महापालिका निवडणुकीतील जागावाटपावर याचा परिणाम होईल असे सांगत काही पदाधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | जेवढी मतदानाची टक्केवारी वाढेल, तेवढ्या महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील – चंद्रकांत पाटील

Shirur LokSabha | “मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे”, आढळराव पाटलांचे अमोल कोल्हेंचे प्रत्युत्तर

Sunetra Pawar | केंद्र व राज्य सरकारचा दुवा बनून समस्यांचं निराकरण करणार; सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन