मुख्यमंत्री शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी करमाळा तालुक्यातून दहा हजार शिवसैनिक जाणार!!!

करमाळा – शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली मुंबई येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दहा हजार शिवसैनिक करमाळा तालुक्यातून जाणारा असून सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत व जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांचे नेतृत्वाखाली नियोजन सुरू असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली.

आज शिवसेनेच्या करमाळा कार्यालयात नवनियुक्त उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील तालुका प्रमुख देवानंद बागल करमाळा तालुका शिवसेनाप्रमुख प्रवक्ते शिरीष लोणकर शहर प्रमुख संजय शीलवंत उपतालुकाप्रमुख प्रशांत नेटके दादासाहेब थोरात उपशहर प्रमुख नागेश गुरव निखिल चांदगुडे राजेंद्र काळे गायकवाड युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख वैभव मावळकर तालुकाप्रमुख राहुल कानगुडे शहर प्रमुख विशाल गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी तालुक्यातील संघटन मजबूत करणे तालुकाप्रमुख देवानंद बागल यांनी गावोगावी शाखा काढण्याचे मनोदय व्यक्त केला. दसरा मेळाव्यासाठी जाण्यासाठी इच्छुक असलेल्या शिवसैनिकांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडे आपली नाव नोंदणी करावी असे आव्हान उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील यांनी केले. या क्रम कार्यक्रमासाठी हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर कोळगाव शाखाप्रमुख नागेश शेंडगे कुंभेज शाखाप्रमुख मारुती भोसले संजय जगताप पिंटू गायकवाड सुनील वायकर सुरज कांबळे आधी जण उपस्थित होते.