तुळजापूर : भिक मागणा-या दहा बालकांच्या ६ पालकांविरोधात गुन्हा दाखल 

तुळजापूर – श्रीतुळजाभवानी मंदीर येथील महाद्वारासमोरून १० बालकांना भिक मागताना पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणी दहा बालकांच्या ६ पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई मिशन वासल्य समिती पथकाने केल्याची माहिती आहे.

या बाबतीत प्रशासनाने अधिक माहीती अशी  श्री तुळजाभवानी मंदीर महाव्दार समोर १० बालके भाविकांकडे भीक मागत असताना मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेऊन बालकांना विश्वासात घेऊन त्याचेकडे त्यांना भिक कोणी मागण्यास लावले याबाबत चौकशी केली असता सदर बालकांनी त्यांच्या वरील नमुद पालकांनी त्यांना भिक मागण्यासाठी सांगीतलेअसुन ते संध्याकाळी आम्ही गोळा केलेले पैसे त्यांना देतो असे सांगीतले . त्यावरून प्रशासनाची खात्री झाली की वरील बालकांच्या नमुद पालकांनी सदर बालकांना भिक मागण्याची व्यवस्था करून त्यांना भिक मागण्यासाठी प्रोत्सोहन देवुन त्यांना भिक मागण्यासाठी प्रवृत केले आहे.

या प्रकरणी गोरख अजिनाथ काळे,सुमन बबन काळे , शहाजी विष्णू काळे,कोंडाबाई सुभाष पवार  उमाबाई अरुण शिंदे ,कोंडाबाई बलभिम काळे यांनी त्यांच्या ( अंदाजे 6 ते 12 वयोगटातील ) लहान वयाच्या बालकांना भिक मागण्यासाठी प्रोत्साहन देवुन त्यांना भिक मागण्यासाठी प्रवृत्त केले.  बाल न्याय ( बालकाची काळजी व संरक्षण ) अधिनियम 2015 चे कलम 76 अन्वये तसेच महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम कलम 11 अन्वये कायदेशिर फिर्याद दिली.

यावरुन वरील सहा पालकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सदरील कारवाई मिशन वात्सल्य पथक प्रमुख सौदागर तांदळे यांच्या मार्गदर्शन खाली विस्तार अधिकारी नागेश वाकडे पोलीस उपनिरक्षक रुकमीणी मंजुळे सह विविध विभाग प्रमुख सह पंचावन्न कर्मचारी सहभागी झाले होते.