अभिनेते शरद पोंक्षेंनी शरद पवार यांची भेट घेतली; उलटसुलट चर्चा झाल्या सुरु  

मुंबई – अभिनेते शरद पोंक्षे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शुक्रवारी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे ही भेट असून नाट्य परिषदेत सुरु असलेल्या वादाबाबत भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शरद पोंक्षे यांच्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या प्रमूख कार्यवाह पदावरून हकालपट्टी प्रश्ननी वाद सुरु असताना पोंक्षे यांनी ही भेट घेतली आहे. दरम्यान, यावेळी निर्माता प्रसाद कांबळी उपस्थित होते असं दिसतंय .

दरम्यान, दोघांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झालीय याबाबतची माहिती सध्या तरी समोर आलेली नाही. याशिवाय शरद पवार आणि शरद पोंक्षे दोघांकडून या भेटीबाबत काही प्रतिक्रिया आलेली नाही.  विशेष म्हणजे शरद पोंक्षे हे अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे टीकेचे धनी बनले आहेत. असं असताना आज त्यांनी थेट शरद पवारांची भेट घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरु असल्याची चर्चा आहे.