राज्यसभेसाठी उद्धव ठाकरे MIM-समाजवादीच्या दाढ्या कुरवाळतायत; मनसेचा शिवसेनेवर  हल्लाबोल

मुंबई – राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी (MVA ) आणि भाजपमध्ये(BJP) सध्या जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. राज्यसभेची सहावी जागा जिंकण्याचा दोन्ही बाजूंनी प्रयत्न होत असून या निमित्ताने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. आपला विजय निश्चित व्हावा यासाठी महाविकास आघाडीकडून आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले असून अपक्षांना तसेच छोट्या पक्षांना आपल्या बाजूनेवळविण्यासाठी   दोन्ही बाजूने  मोठ्याप्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत.

शिवसेना आणि भाजप (Shiv Sena and BJP) या दोन्ही पक्षांनी राज्यसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. (rajya-sabha-elections) राज्यसभेची सहावी जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा निर्धार दोन्ही बाजूच्या नेत्यांनी व्यक्त केला असून या निवडणुकीत विरोधी पक्षाला धूळ चारण्यासाठी दोन्ही पक्षातील दिग्गज नेते व्यूहरचना करत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या एमआयएम (MIM) पक्षाचीही मदत घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने शिवसेनेकडून हालचालीही सुरू आहेत.

एका बाजूला या सर्व घडामोडी घडत असताना दुसऱ्या बाजूला मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे (MNS spokesperson Sandeep Deshpande) यांनी ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना डिवचलं आहे.  ‘तत्वासाठी सत्तेवर लाथ मारणारे दिवंगत बाळासाहेब कुठे आणि एका राज्यसभेच्या जागेसाठी एमआयएम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे आमचे नंबर वन कुठे?’ असा खरमरीत सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.