Murlidhar Mohol | आम्हाला पडणारं मतदान निश्चित आहे; मोहोळांबाबत धीरज घाटेंनी व्यक्त केला विश्वास

Murlidhar Mohol: पुणे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपकडून माजी महापौर आणि प्रदेश भाजपचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यापुढे महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांचे आवाहन असेल. दरम्यान भाजपाचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी पुण्यात महायुतीचाच विजय होणार असा विश्वास व्यक्त केला. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी आणखी दोन तीन दिवसांनी पुण्यात फक्त तिरंगी नव्हे तर चौरंगी लढतही पाहायला मिळेल, असे धीरज घाटे म्हणाले. महायुती वसंत मोरे आणि रवींद्र धंगेकर यांच्या आव्हानाकडे कसे पाहता?, असे विचारले असता धीरज घाटे म्हणाले, “आम्हाला पडणारं मतदान निश्चित आहे. केंद्रात तसेच राज्यात नरेंद्र मोदींच्या कामावर खूश असणाऱ्या मतदारांचं मत मुरलीधर मोहोळांना पडणार आहे. पुणे शहरात भाजपाचा मतदारवर्ग आहे, जो वर्षांनुवर्षे भाजपाला मतदान करत आला आहे. त्यात आता अजित पवारांची ताकद महायुतीला मिळाली आहे. तसेच एकनाथ शिंदेंची शिवसेनाही सोबत आहे, रिपब्लिकन पार्टी आणि इतर घटक पक्षही आहेत. याचा मोहोळांना नक्कीच फायदा होणार आहे”, असे त्यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत