‘ही’ शिवसेना आहे इथे निष्ठावंतांना न्याय मिळतोच; विधान परिषदेसाठी मिळणार आमशा पडवी यांना संधी

मुंबई – राज्यात विधान परिषदेच्या (Legislative Council) दहा जागांसाठी येत्या 20 तारखेला निवडणूक होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि मविआमध्ये चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात विधानपरिषदेतून सभापती रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांच्यासह सुभाष देसाई(subhash desai), दिवाकर रावते(diwakar Rawate), (शिवसेना) प्रवीण दरेकर(Pravin darekar), सदाभाऊ खोत(sadabhau khot), प्रसाद लाड(Prasad lad), विनायक मेटे(Vinayak mete), सुजितसिंह ठाकूर, स्व. आर. एस. सिंह, (Sujit Singh Thakur, late. R. S. sinh) (सर्व भाजप) संजय दौंड(sanjay duand) (राष्ट्रवादी) हे दहा सदस्य निवृत्त होणार आहे.

विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला निवडणूक होत आहे. शिवसेनेचे सुभाष देसाई व दिवाकर रावते हे दोघे निवृत्त होत आहेत. दरम्यान, सामान्य शिवसैनिकाला संधी देण्याच्या राज्यसभा निवडणुकीतील कित्ता विधान परिषद निवडणुकीतही गिरवत नंदुरबारचे कट्टर शिवसैनिक व जिल्हाप्रमुख आमशा पडवी यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तयार राहण्याचा आदेश शिवसेनेने दिला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागातील सेनेचा एक आक्रमक आदिवासी चेहरा (Tribal face) म्हणून ओळख असलेले आमशा पाडवी (Amsha Padvi) यांच्या नावावर शिवसेना विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून लवकरच शिक्कामोर्तब करेल, अशी माहिती आहे. आमशा पाडवी हे नंदुरबारचे शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. मागील ३० वर्षांपासून ते अक्कलकुवा भागात कार्यरत असून त्यांनी पक्षाचं संघटन मजबूत करण्यासाठी अनेक वर्ष मेहनत घेतली आहे.