Umesh Patil | आमच्याकडून काही त्रुटी राहिल्या होत्या, त्या दुरुस्त करुन आम्ही विधानसभेला सामोरे जाऊ

Umesh Patil | या निवडणुकीत आमच्याकडून काही चूका किंवा त्रुटी राहिल्या होत्या त्यातून बोध घेऊन दुरुस्त केल्या जातील आणि आम्ही विधानसभेला सामोरे जाऊ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

महायुतीमध्ये कोणतेच वाद नाहीत. निवडणुकीत ज्यांना यश मिळाले आहे त्यांच्याकडून काही वक्तव्य येत आहेत तर अपयशामुळे आमच्या खालच्या स्तरावरील कार्यकर्त्यांची वक्तव्य येत आहेत परंतु येणारी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून आमच्यामध्ये कोणातही समज – गैरसमज निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

अंतर्गत मतभेदाचे विषय समन्वय समितीसमोर मांडून त्याचे निराकरण केले जाईल. त्यामुळे ‘आमचे लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे आहे हेही उमेश पाटील (Umesh Patil) यांनी सांगितले.

संघाचे ‘ते’ अधिकृत मुखपत्र नाही पण संघाच्या विचारधारेची भूमिका मांडणारे ते मुखपत्र आहे. त्यात ज्यांनी हा लेख लिहिला आहे त्याच्याशी भाजपचे शिर्षस्थ नेते सहमत आहेत असे मला वाटत नाही असे सांगतानाच अपयश आल्यावर त्याला वेगवेगळी कारणे शोधली जातात. राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात असतात त्यावेळी त्रुटी शोधून आरोप करत असतात. राजकारणात आरोपप्रत्यारोप होत असतात. अंतिम निष्कर्षावर सगळे ठरत असते. संघाने जे काही म्हटले आहे त्यात तथ्य आहे असेही मला वाटत नाही असेही उमेश पाटील म्हणाले.

अजितदादांचे राजकीय काम आणि मेहनत लक्षात घेऊन त्यांच्यासोबत दिर्घकालीन राहण्याचा निर्णय भाजपच्या शिर्षस्थ नेतृत्वाने घेतला आहे त्यावर ते ठाम आहेत असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप