राष्ट्रवादीची दादागिरी या राज्यात खपून घेतली जाणार नाही; पांडुरंग शिंदे यांचा इशारा

नांदेड – रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे गेल्या २९ एप्रिल पासून जागर शेतकऱ्याचा ,आक्रोश महाराष्ट्राचा हे राज्यव्यापी अभियान संपूर्ण राज्यात येऊन जात आहेत. शेतकरी (Farmers), शेतमजूर (Agricultural labor), विद्यार्थी यांच्या प्रश्नाला या अभियानातून हे वाचा फोडत आहेत .

रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे (Pandurang Shinde) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सोलापूर (Solapur) दौऱ्यावर असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सदाभाऊ म्हणाले की केतकी चितळेच्या (Ketaki Chitale) पोस्ट आम्ही समर्थन करत नाही पण ज्या पद्धतीने केतकी चितळे ला पोलिसांनी अटक केली व राष्ट्रवादीच्या (NCP) काही लोकांनी तिच्यावर अंडी फेक केली,ह्या गोष्टी योग्य नाही , न्यायालयात स्वतः आपली भूमिका मांडणार आहे आपल्या मतावर ठाम आहे या भूमिकेचे त्यांनी समर्थन केले आहे.

या भूमिकेवर राष्ट्रवादीच्या बांडगुळानी सोलापूरच्या विश्रामगृहात भाऊ वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही राष्ट्रवादीची खरी संस्कृती आज महाराष्ट्राने पाहिलेली आहे, हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, राष्ट्रवादीची दादागिरी या राज्यात खपून घेतली जाणार नाही .कोण सरकारच्याविरोधात बोललं त्याचा आवाज बंद करायचा, त्याच्यावर गुन्हे दाखल (Crime filed) करायचे अशा प्रकारे या राज्यांमध्ये गुंडशाही चालू आहे .हे कायद्याचे राज्य आहे का ? हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात प्रश्न निर्माण होत,असे शिंदे निषेध करत आपली भूमिका मांडली. राष्ट्रवादीच्या बांडगुळानी हे गैर थांबवलं नाही तर येणाऱ्या काळात रयत क्रांती संघटना जशास तसं उत्तर देईल आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही. असा इशारा शिंदे यांनी दिला.