Weather Report : महाराष्ट्रात पावसाचा कहर, तर ‘या’ भागात कायम असणार उष्णतेची लाट

Weather Report :- येत्या 4 दिवसांत पूर्व आणि मध्य भारताच्या काही भागात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये 12 जून पर्यंत उष्णतेची लाट असेल असं आय एम डी नं म्हटलं आहे. देशाच्या पूर्व भागात उद्यापर्यंत कमाल तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअनं तर वायव्य भागात पुढील 4 दिवसांत 3 ते 4 अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता तर उर्वरित भागांत कमाल तापमानात कोणताही लक्षणीय बदल अपेक्षित नाही.

दरम्यान, ईशान्य भारत, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, आणि मध्य प्रदेशात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभांगांनं वर्तवला आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपमध्येही ही परिस्थिती कायम राहील, असं आयएमडीने म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्राच्या काही भागात आणि देशाच्या इतर भागांसह दक्षिण महाराष्ट्रात पुढे सरकला असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Naseem Khan : महाराष्ट्रात मराठा, मुस्लिम व धनगर समाजाला त्वरित आरक्षण द्या – नसीम खान

Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद द्या, शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली इच्छा

“अयोध्येतील भव्य मंदिरासोबतच आसपासच्या शहरवासीयांचे…”, भाजपच्या पराभवावर ‘शक्तिमान’ची लक्षवेधी प्रतिक्रिया