Harshvardhan Patil | हर्षवर्धन पाटील घेणार देवेंद्र फडणवीसांची भेट; ‘या’ मुद्द्यावर होणार चर्चा 

Harshvardhan Patil | लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरू आहे. महायुतीतील भाजपा पक्षाने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करत प्रचारात आघाडी घेतली आहे.  मात्र अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा निर्माण झाल्याने इतर पक्षांनी आपली उमेदवारी घोषित केली नसल्याचे चित्र आहे. अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा महायुती मधील कोणत्या पक्षाला सुटेल? हे अजून जाहीर झाले नाही. मात्र जर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली तर हर्षवर्धन पाटील यांची भूमिका काय असेल हे अजून गुलदस्त्यात आहे.

त्यातच हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती गंभीर आरोप करत विरोध दर्शवल्याने सदर बाबतीत तोडगा काढण्यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हर्षवर्धन पाटील यांना फोन आला. हर्षवर्धन पाटील यांना सागर बंगल्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ashish Shelar | भाजपा स्थापना दिनानिमित्त मुंबईत चारशे कार्यक्रमांचे आयोजन, ॲड. आशिष शेलार यांची माहिती

Prakash Ambedkar | आमचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरुन विश्वास उडाला, प्रकाश आंबेडकरांचे थेट काँग्रेस अध्यक्षांना पत्र

Praniti Shinde | जो पक्ष मतांचं विभाजन करतो, तो भाजपाला मदत करतो; प्रणिती शिंदे यांच्याकडून वंचितची अप्रत्यक्ष धुलाई