तुमचे आणि दाऊदचे काय संबंध आहेत? काय बोलणं झालं आहे?; सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई – मनी लाँड्रिंगच्या (money laundering case) आरोपांचा सामना करत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (ED on Nawab Malik) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विशेष न्यायालयाने नवाब मलिकविरुद्धच्या खटल्याची सुनावणी करताना ईडीने सादर केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली. यावर कोर्टाने नवाब मलिक यांचे डी-गँगशी (d company) संबंध होते असं निरीक्षण नोंदवलं आहे.

नवाब मलिक (Nawab Malik) यांचा थेट मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभाग होत असेही न्यायालयाने म्हटले आहे. याशिवाय नवाब मलिकांनी गोवावाला कंपाऊंड मिळवण्यासाठी कट रचल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. मंत्री नवाब मलिक यांनी हसीना पारकरसोबत वारंवार बैठका घेतल्या आणि मनी लाँड्रिंग केलं असं निरीक्षणही कोर्टाने नोंदवलं आहे.

दुसरीकडे भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiyya)यांनी या संपूर्ण प्रकरणावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey), शरद पवार (Sharad Pawar) आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्यांनी माध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांचे सर्व व्यवहार उद्धव ठाकरेंना माहिती होते, असा खळबळजनक आरोप केला आहे. “खरंतर ही चौकशी न करताही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना सगळे आर्थिक व्यवहार माहिती होते. उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा तर बिल्डर आहे. बिल्डर लोकांना सगळं कळतं. मातोश्रीपासून फक्त चार किलोमीटरवर गोवावाला कंपाऊंड आहे. म्हणून उद्धव ठाकरेंना एफएसआयचा रेट वगैरे सगळं माहिती होतं.

उद्धव ठाकरेंचे एडंट यशवंत जाधव यांनी गेल्या दोन वर्षांत अशा अनेक जुन्या बिल्डिंग विकत घेतल्या. हे नवाब मलिक काही लाखांत १०० कोटी बिझनेस टर्नओव्हरचा प्लॉट विकत घेतात. दाऊदचे पार्टनर नवाब मलिक, नवाब मलिकचे पार्टनर उद्धव ठाकरे उत्तर द्या”, असं किरीट सोमय्या म्हणाले.“मला तर शंका आहे की आता नवाब मलिकांना वाचवणारे उद्धव ठाकरे यांना उत्तर द्यावं लागेल की तुमचे आणि दाऊदचे काय संबंध आहेत. काय बोलणं झालं आहे”, असा खोचक सवाल सोमय्या यांनी केला आहे.