Maharashtra Assembly Elections | महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक कधी होणार? पहा नेमकं काय होणार ? 

लोकसभा निवडणूकीचा निकाल येत्या 4 जूनला निकाल लागणार असून आता दुसऱ्या बाजूला विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Elections) चर्चा देखील हळूहळू सुरु झाली आहे. विधानसभेची निवडणूक कधी होणार याबाबत विविध तर्क लढवले जात असून आता इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

महाराष्ट्रातील विधानसभेची (Maharashtra Assembly Elections) मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे तर हरियाणाची मुदत 3 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये एकाच वेळी निवडणुका होण्याची शक्यता असून यावर्षी दिवाळीपूर्वीच निवडणूक होऊ शकते. ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होण्याची चिन्हे दिसत आहेत. 2009 सालापासून महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा निवडणूक एकाच वेळी होत आहे. हरियाणा आणि महाराष्ट्र दोन्ही विधानसभांची मुदत 23 दिवसांच्या अंतराने संपत असल्यामुळे नियमानुसार एकत्र निवडणूक घेणे आवश्यक आहे. या वर्षी दिवाळी ही 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. हरियाणा राज्यात विधानसभा 4 नोव्हेंबरला अस्तित्वात येणे आवश्यक आहे.

सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. खरंतर दिवाळीनंतर राज्यात विधानसभेची निवडणूक घेण्यास बराच कालावधी मिळतो. मात्र हरियाणा विधानसभेची मुदत आधी संपत असल्यामुळे महाराष्ट्रातही आधी निवडणूक घ्यावी लागणार आहे. 2019 साली महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये 21 ऑक्टोबरला मतदान झाले होते. यंदाही याच तारखेच्या आसपास, 21 ते 26 ऑक्टोबरच्या आठवड्यात मतदान होऊ शकते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप