“Manoj jarange शरद पवारांचा माणूस, प्रसिद्धीसाठी मराठा मुलांचा…”, आता कुणी केले गंभीर आरोप?

Manoj Jarange patil: अजय महाराज बारसकर, संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यांच्यावरील आरोपांचे सत्र थांबता थांबत नाहीये. आता मनोज जरांगेंचे जुने सहकारी बाबुराव वाळेकर यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत. मनोज जरांगे हा फ्रॉड माणूस आहे, तो राष्ट्रवादीसाठी काम करतो, तो प्रसिद्धीसाठी मराठा मुलांचा वापर करतो, अशी टीका बाबुराव वाळेकर (Baburao Walekar) यांनी केली आहे.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपण कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, कोणत्याही पक्षाचे आपले संबध नाहीत असे सांगत आहेत. मात्र, जरांगे पाटील हा राष्ट्रवादीचा माणूस आहे. शरद पवार आणि राजेश टोपेचा माणूस आहे असा थेट आरोप जरांगे पाटील याचे जुने सहकारी बाबुराव वाळेकर यांनी केलाय.

मनोज जरांगे याच्यासोबत 17 ते 18 वर्षांपासून काम करतोय. हा माणूस समाजाची दिशाभूल करतोय हे मी उघडं करणार आहे. 2011 ला त्यांनी एक संघटना उघडली. मी त्या संघटनेत होतो. कोपर्डीची घटना झाली त्यावेळी जरांगे यांनी एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. आम्हाला भावनिक करण्याचं काम केलं, मुलीला न्याय द्यायचा असं म्हणाले. त्या बैठकीला आम्ही 10 ते 12 जण होतो, असे वाळेकर यांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांनी त्या बैठकीत आरोपीवर हल्ला करायचा असं सांगितले. मढीजवळ रेस्टहाऊसला आम्हाला ठेवलं. त्यातील अर्धेजण तेव्हा मागे फिरले. आम्ही 4 जण सोबत राहिलो. आमच्यातला एक राजू चांगल्या नोकरीला होता. त्याला भावनिक करुन राजी केलं. आरोपी अहमदनगर कोर्टात आला. आम्ही चौघे वेगळ्या साईटला थांबलो आणि जरांगे पाटील एका बाजूला उभे राहिले. आम्ही 4 जणांनी आरोपीवर हल्ला केला. पण, जरांगे पाटील यांनी तेथून पळ काढला असा आरोपही बाबुराव वाळेकर यांनी केला.

जरांगे पाटलांवर 420 चा गुन्हा का झाला तर फसवल्यामुळे. 10 ते 12 जणांचे संसार त्यांनी जरांगे पाटलांनी उध्वस्त केले. आम्ही जेलमध्ये गेलो. स्वतः प्रसिध्दी मिळवली. पण आम्ही जेलमध्ये होतो. आम्हाला काहीच मिळाले नाही. जरांगे पाटील हा फ्रॉड माणूस आहे. कोपर्डी घटनेतील आरोपींवर हल्ला घटनेतील आम्ही आरोपी आहोत. आमच्याकडे भयानक पुरावे आहेत. वेळ पडली की तेही देईन, असा इशाराही त्यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या-

Manoj Jarange – माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, मी आता सागर बंगल्यावर येतो

Mahesh Tapase | राज ठाकरेंची मनसे राजकीय नामशेष होण्याच्या मार्गावर

Nana Patole – १० वर्ष देशाला फसवणाऱ्या मोदी सरकारचे काऊंटडाऊन सुरु, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार