पुण्यात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढली; हजारो घुसखोर झाले स्थायिक 

पुणे –  राेजगारासह इतर निमित्ताने बांग्लादेशी घुसखाेर माेठया संख्येने पुन्हा एकदा देशातील विविध शहरात स्थायिक हाेत असल्याचे गुप्तचर यंत्रणेच्या सर्व्हेक्षणातून समाेर येत आहे. परंतु पाेलीसांकडून अत्यल्प कारवाई हाेत असल्याने बांग्लादेशी घुसखाेरांचे फावल्याचे दिसत आहे.दिव्य मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.

यावृत्तात  गुप्तचर यंत्रणेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात मागील काहीकाळात पुण्यात तब्बल पाच हजार बांग्लादेशी कुटुंबा समवेत स्थायिक झाले अाहे. परंतु तीन वर्षाच्या कालावधीत केवळ पाच बांग्लादेशी घुसखाेरांची मायदेशी पाठवण झाली असल्याचे म्हटले आहे.

बांग्लादेशी सीमारेषा ओलांडून  भारतात  आल्यानंतर बांग्लादेशी दागिने कारागीर,बांधकाम मजुरी काम, हाॅटेल वेटर काम, चिकन सेंटर, फेरीवाले अादी निमित्त देशातील वेगवेगळया भागात स्थायिक हाेत आहेत. अशाचप्रकारे मागील सात ते अाठ वर्षात पुण्यातील हडपसर परीरातील ससाणेनगर, चाकण अाैद्याेगिक क्षेत्र, वाघाेली, कॅम्प, लाेणी काळभाेर आदी परिसरात बांग्लादेशी घुसखाेरांनी आपले बस्तान बसवले आहे.

भाडयाने खाेली घेऊन राहिल्यानंतर कामानिमित्त स्थायिक झाल्यावर स्थानिकांना आपण पश्चिम बंगालचे रहिवासी असल्याचे सांगून स्थानिक अाधारकार्ड, पॅनकार्ड, शिधापत्रक व इतर शासकीय कागदपत्रे तयार केली जात अाहे. संबंधित कागदपत्रे बनविण्यास स्थानिक लाेकप्रतिनिधींची मदत हाेत असल्याचे देखील तपास यंत्रणेच्या रडारवर अाले अाहे. पुणे शहर व परिसरात बांग्लादेशी संख्या वाढत असताना, त्यांचेवर काेणतीही ठाेस कारवाई पाेलीसांकडून केली जात नसल्याचे दिसून येत अाहे.

तीन वर्षात केवळ पाचजणांची पाठवण
पुणे पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२० मध्ये एक बांग्लादेशी तर सन २०२१ मध्ये दाेन जण अाणि २०२३ मध्ये दाेन जण अशा एकूण पाचजणांची केवळ बांग्लादेशला बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी पाठवण केल्याचे सांगण्यात अाले अाहे. बांग्लादेशी घुसखाेर शाेध माेहीम प्रत्येक पाेलीस ठाण्याचे अंर्तगत राबविण्यात यावी असे अादेश देण्यात अालेले अाहे परंतु त्यास अत्यल्प प्रतिसाद मिळत अाहे. बांग्लादेशी व्यक्ती शाेधणे, त्यांची कागदपत्रांची पडताळणी करणे, त्यांचे साथीदार शाेधणे तसेच त्यांची पाठवण करणे अादी कामे वेळखाऊ असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत अाहे. दरम्यान, दिव्या मराठीच्या या वृत्ताने एकच खळबळ उडाली असून गृह विभाग यावर आता काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.