शरद मोहोळ आहे तरी कोण? हत्या, खंडणीसह शेकडो गुन्हे दाखल, गुन्हेगारी विश्वात कशी झाली एंट्री?

Who Was Gangster Sharad Mohol :-  पुण्यातील गुंड शरद मोहोळ याच्यावर कोथरुडमधील सुतारदरा भागात येथे भरदिवसा गोळ्या झाडण्यात आल्या. शरद मोहोळला तीन गोळ्या लागल्याची माहिती आहे. गोळीबारानंतर त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे समजत आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, कोथरुड भागात दहशत असलेला शरद मोहोळवर दुपारी सुतारदरा परिसरात दुपारी दीड वाजता हल्लेखोरांनी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. या घटनेत मोहोळ गंभीर जखमी झाला. हल्लेखोर तेथून पसार झाले. यानंतर शरद मोहोळला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र  उपचारादरम्यान त्याचा मृ्त्यू झाला आहे. पूर्ववैमन्यासातून शरद मोहोळची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

शरद मोहोळ कोण होता?

शरद मोहोळ हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार होता. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे गुन्हे दाखल होते. पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. याप्रकरणात तो जामिनावर बाहेर आला होता. पण दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे अपहरण केल्याप्रकरणात पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या. जुलै 2022 मध्ये शरद मोहोळ याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी तडीपार करण्यात आले होते. शरद मोहोळ हा दहशतवादी कातील सिद्दीकी याच्या खुनातील आरोपी होता. कातिल सिद्दीकीचा येरवडा कारागृहात गळा आवळून खून करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या-

‘त्यांच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं..’, रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांवर भाजपाची टीका

‘राम बहुजनांचे, ते मांसाहारी अन्न खात असत’, जितेंद्र आव्हाड यांचे विधान

अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय पोहोचली बागेश्वर बाबांच्या दरबारात