Yemen coastal area | धक्कादायक | बोट बुडाल्यानं ४९ जणांचा मृत्यू आणि १४० जण बेपत्ता

यमेनच्या किनारी भागात बोट (Yemen coastal area) उलडून झालेल्या अपघातात ४९ स्थलांतरितांचा मृत्यू झाला असून १४० जण बेपत्ता असल्याची भिती वर्तवण्यात येत आहे. अशी माहिती स्थलांतरितांसाठीच्या आंतरराष्ट्रीय संस्थेनं दिली आहे.

येमेनच्या शाब्वा प्रांताच्या (Yemen coastal area) किनाऱ्याजवळील पाण्यात हॉर्न ऑफ आफ्रिकेपासून येमेनकडे स्थलांतर मार्गावरील सर्वात प्राणघातक घटनांपैकी हा एक घटना असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. सोमालियातील बसासो या किनारी भागातून ११५ सोमाली आणि १४५ इथिओपियाच्या नागरिकांनी घेऊन हे जहाज गेल्या रविवारी निघालं होतं. यामध्ये ९० महिलांचा समावेश होता.

गस्ती नौकांच्या कमतरतेमुळे आणि परिसरात सुरु असलेल्या संघर्षांमुळे स्थानिक अधिका-यांना शोध आणि बचाव कार्यात अडथळे येत होते. या भागातील मच्छीमारांसह स्थानिकांनी मृतदेह बाहेर काढण्यात आणि इतरांना वाचवण्यात मदत केली. असंही IOM नं सांगितलं.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांनी स्विकारला सहकार राज्यमंत्रीपदाचा कार्यभार

Maharashtra Sadan In Ayodhya | अयोध्यत उभे राहणार महाराष्ट्र सदन, २.३२७ एकरचा भूखंडाला उत्तर प्रदेश सरकारची मंजूरी