हडकोळण गावातील शिलालेख पोस्ट करत मनसेच्या नेत्याने अजित पवारांना खडेबोल सुनावले

Pune – गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांचा अपमान हा कळीचा मुद्दा बनला समाहे. यातच आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या एक वक्तव्य सध्या चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय. आपण जाणीवपुर्वक छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक संभाजी महाराज म्हणतो. काही जण धर्मवीर म्हणतात. राजे धर्मवीर नव्हते, असं अजित पवारांनी (Ajit Pawar On Dharmaveer sambhaji maharaj )  म्हटले आहे.

छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्यरक्षक म्हणतो, काही जण मात्र धर्मवीर म्हणतात. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. संभाजी महाराजांनी कधीच कुठे धर्माचा पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. यावर काही जण जाणीवपूर्वक धर्मवीर असे म्हणतात. मी मंत्रिमंडळात असताना, निर्णय घेताना सगळ्यांना सांगायचो की, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज असा उल्लेख आपण करावा, असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार स्वतःला जाणता राजा म्हणवून घेतात. खा. सुप्रिया सुळे  गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या ज्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक मजकूर आहे अशा पुस्तकाची जाहिरात करतातयामुळे पवार घराण्यावर आधीच शिवप्रेमी नाराज असताना आता अजित पवार हे संभाजी राजे धर्मवीर नव्हते, असं म्हणत आहेत. दरम्यान, या वादग्रस्त वक्तव्याचे आता पडसाद दिसू लागले आहेत.

यावरून आता मनसेचे नेते योगेश खैरे यांनी एक लक्ष्यवेधी ट्वीट केले आहे. यात ते म्हणतात, हा छत्रपती संभाजी महाराजांच्या आज्ञापत्राचा गोव्यातील हडकोळण गावातील शिलालेख आहे. यात दोन वाक्ये आहेत….1) आता हे हिंदू राज्य जाहले 2) धर्मकृत्याचा नाश करू नये ! अजित दादा…. छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीर’च होते. धर्मासाठी त्यांनी जीवाची पर्वा केली नाही ! असं खैरे यांनी म्हणत अजित पवारांना चांगलंच सुनावले आहे.