Pune : हॉटेल चालकास ४ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा गंडा घालणाऱ्या तोतया फुड इन्स्पेक्टरला अटक

दौंड – दौंड तालुक्यातील यवत जवळील कांचन व्हेज (Kanchan Veg) या प्रसिद्ध हॉटेलच्या चालकास ४ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा गंडा घालणाऱ्या तोतया फुड इन्स्पेक्टरला यवत पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे . यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नारायण पवार (Police Inspector Narayan Pawar) यांनी ही माहिती दिली . (Pune: Fake food inspector arrested for defrauding hotel owner)

दि.०३ जून २०२२ रोजी दुपारी १२:३० वा. ते दि.०२/०६/२०२२ रोजी सायं.५:३० वाचे.पर्यत वेळोवेळी यातील हॉटेल मालकास मुंबई मंत्रालयातुन फुड इन्स्पेक्टर (Food Inspector)  असल्याचे भासवुन तुमच्या हाॅटेलची तक्रार माझेकडे आलेली आहे. तुमच्या हाॅटेलमुळे एका महीलेला फुड पाॅयझनिंग झाले आहे म्हणुन तिने माझेकडे तक्रार दिलेली आहे. त्यामुळे आमची टिम तुमचे हाॅटेल सिल करण्यासाठी तुमच्याकडे येत आहे. तुमच्यावर कारवाई करायची नसेल तर तुंम्ही मी सांगतो त्या खात्यावर पैसे जमा करा असे सांगुन सदर हॉटेल मालक यांचेकडून वेळोवेळी एकुण ४ लाख ४२ हजार ५०० रूपये ऑनलाईन घेवुन फसवणुक केली . याबाबत यवत पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.-४८७/२०२२ भा.द.वि. कलम ४२० असा गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयाच्या अनुषंगाने यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सदर गुन्हयचा तपास गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांच्याकडे देऊन गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणावयास सांगीतले होते . पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे (Sub-Inspector of Police Sanjay Nagargoje) यांनी तपासाची सूत्रे फिरवून सदर चा आरोपी हा वेगवेगळ्या बोगस मोबाईल नंबर वरून फोन करत असुन तांत्रिक माहितीच्या आधारे ते सोलापूर येथे असल्याबाबत माहिती झाल्याने यवत पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने सोलापूर येथे जाऊन आरोपी १)सुरज सुरेश काळे (वय ४० वर्षे )(रा मधूबन नगर सोलापूर) २)धर्मराज शिवाप्पा शिकलवाडी (वय ३६ वर्षे) ( रा रामवाडी धोंडिबा वस्ती, सोलापूर) हे दोघेही एका ऑनलाइन मनी ट्रान्सफर शॉप वर फिर्यादी यांनी पाठवलेले पैसे नेण्याकरिता आले असता त्यांना तांत्रिक माहितीच्या आधारावर रिक्षामधून पळून जात असताना त्यांच्या पाठलाग करून अतिशय शिताफीने पकडून जेरबंद केले आहे .

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीसअधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक नारायण पवार यवत पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक संजय नागरगोजे , पो.ना.राम जगताप , पो.कॉ.प्रवीण चौधर ,पो.कॉ.मारुती बाराते ,यांनी केलेली आहे.