‘मोदी’प्रेम! १४ लेकरांची आई पंतप्रधान मोदींना देणार १५ एकर जमीन; म्हणाल्या, मोदी माझा मुलगा

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा चाहतावर्ग मोठा आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारे नरेंद्र मोदींवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात. राजगड जिल्ह्यातील एका वृद्ध महिलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला मुलगा मानले असून त्यांना आपली जमीनही देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

या महिलेचं वय १०० वर्ष असल्याचं सांगितलं जात असून त्यांचं नाव मांगी बाई आहे. तसेच ही महिला पंतप्रधान मोदींना १५.४७५ एकर म्हणजेच २५ बीघे जमीन देखील देणार आहे. त्यांना पीएम मोदी यांची भेट घेण्याची देखील इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वृद्ध महिलेला स्वतःचे १४ मुलं आहेत तरी देखील मोदी स्पेशल लेक असल्याचे या महिलेने सांगितले आहे.

ही वृद्ध महिला मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील हरिपुरा जागीर गावातील रहिवासी आहेत. कुटुंबियांनुसार त्यांचं वय १०० वर्ष आहे. त्यांनी आपल्या घरात पीएम मोदी यांचा फोटो लावला आहे. तो फोटो त्या रोज सकाळी जवळ घेवून पाहातात.

महिलेचं म्हणणं आहे की, मोदी मला मदत करत आहेत. मी दर महन्यानला गहू आणि पेशंन देतात. माझे १४ मुलं आहेत मात्र मोदी देखील माझा मुलगा आहे. मला माझी २५ बिघे जमीन द्यायची आहे. मला पंतप्रधानाना भेटाण्याची इच्छा आहे असेही त्यांनी सांगितलं.

ते वृद्धांना घर देत आहेत. त्यांच्या खाण्या-पिण्याची काळजी घेत आहे, दर महिन्याला गहू आणि पेन्शन देखील देत आहेत. त्यांनी सांगितलं की, जर संधी मिळाली तर त्या मोदींच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद देतील. यासोबतच त्यांनी आपली पेन्शन आणखी थोडी वाढवण्याची मागणी देखील करणार असल्याचे सांगितले.