“15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्यदिवस नाही…”, संभाजी भिडे यांच्या वक्तव्याने पेटला नवा वाद

Sambhaji Bhide On Independence Day : नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे अर्थातच भिडे गुरुजी यांनी स्वातंत्र्य दिनावरुन विवादित विधान केले आहे. १५ ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्यदिवस नाही, या दिवशी फाळणी झाली होती. ज्या स्वातंत्र्यासाठी लक्षावधी पोरांनी फासावर लटकवून घेतलं. वंदे मातरम म्हटलं ते व्यर्थ नाही, असे भिडे गुरुजी म्हणालेत.

आता ठाम निर्धार करायचा. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मान्य, हे हांडगं स्वातंत्र्य असेल ते पत्करलं पाहिजे. यावर्षीपासून ९ च्या ठोक्याला भगवा झेंडा घ्यावा. तिरंगाही घ्यावा छोटासा. दखलपात्र म्हणून. असं म्हणून संभाजी भिडे यांनी तिरंगा आणि भगवा ध्वज याबाबत वाद निर्माण होईल, असं विधान केलं आहे.