Sanju Samson | ‘संजूची निवड झाली नाही तर भारताचे नुकसान होईल..’ अंपायरने निवडकर्त्यांना बजावले

Sanju Samson | 2024 च्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) भारताचा 15 सदस्यीय संघ कसा असेल हा प्रश्न सर्वांच्या मनात घोळत आहे. आता माजी क्रिकेटपटूही विश्वचषकासाठी आपापल्या 15 सदस्यीय संघांची निवड करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय 1 मे रोजी टीम इंडियाची घोषणा करू शकते. यावेळी टीम इंडियामध्ये अनेक तरुण नवे चेहरे दिसू शकतात आणि अनेक खेळाडूंना बाहेर बसावे लागू शकते. आता राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला (Sanju Samson) आयपीएलच्या टी-20 विश्वचषकात उतरवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

अंपायरने निवडकर्त्यांना दिला इशारा!
आयपीएल 2024 मध्ये, 27 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. राजस्थानने हा सामना 7 विकेटने जिंकला. यासह राजस्थान आयपीएल 2024 मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने अप्रतिम खेळी केली. संजूने लखनौविरुद्ध 33 चेंडूत नाबाद 71 धावा केल्या. यादरम्यान संजूने 7 चौकार आणि 4 शानदार षटकार मारले होते.

आता, संजू सॅमसनबद्दल, अंपायर रिचर्ड केटलबरो यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, जर संजू सॅमसन आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 खेळला नाही, तर संजूपेक्षा हा भारताचे जास्त नुकसान असेल असे दिसते. याशिवाय सोशल मीडियावर चाहत्यांनीही संजूचा टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये समावेश करण्याची मागणी सुरू केली आहे.

आयपीएल 2024 मध्ये संजूची कामगिरी
आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या मोसमात राजस्थानचा संघ केवळ एकच सामना हरला आहे. ज्यामध्ये संजूची मोठी भूमिका आहे. या मोसमात आतापर्यंत संजूने 9 सामन्यात 161 च्या स्ट्राईक रेटने 385 धावा केल्या आहेत. त्यानंतर संजू 2024 टी-20 विश्वचषक खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, यावेळी यष्टिरक्षकांची निवड करणे निवडकर्त्यांसाठीही आव्हानात्मक असणार आहे. कारण संजू व्यतिरिक्त ऋषभ पंत आणि केएल राहुलही जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत.

समस्या जाणून घेणार आहे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार देखील करणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा