Shirur LokSabha | कांदाभावावरुन अमोल कोल्हे आणि शिवाजीदादांमध्ये जुंपली, आरोपांचे पुरावे देण्याचे आढळरावांचे आव्हान

पुणे | शिरुर लोकसभा (Shirur LokSabha) मतदारसंघात महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्यात लढत होत आहे. निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये दोन्ही नेते एकमेकांवर आगपाखड करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आता शिवाजीराव पाटलांनी अमोल कोल्हेंना ओपन चॅलेंज दिले आहे. अमोल कोल्हे यांनी आढळरावांवर कांदाभावावरुन धारेवर धरलं होतं. त्यावर उत्तर देताना आढळरावांनी कोल्हेंवर आगपाखड केली आहे.

“गेली ३ महिने फक्त कांदा-कांदा करणाऱ्या कोल्हेंकडे कोणतेच विषय शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळं ते घाणेरडे, खालच्या पातळीचे आणि निचपणाचे आरोप अमोल कोल्हे करू लागले आहेत. माझ्यावर केलेल्या आरोपांचे आता कोल्हेंनी पुरावे द्यावेत, मी स्वतः शिरूर लोकसभेतुन (Shirur LokSabha) माघार घेतो अन्यथा कोल्हेंनी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडावं”, असं खुलं आव्हान शिवाजीराव आढळराव पाटलांनी अमोल कोल्हे यांना दिलं आहे.

अमोल कोल्हे काय म्हणाले होते?
दोनचं दिवसांपूर्वी जुन्नरमधील शरद पवारांच्या सभेत कोल्हेंनी आढळरावांवर निशाणा साधला होता. ‘काहींनी १५ वर्षात शेती प्रश्नाऐवजी संरक्षण खात्याच्या प्रश्नांनाच प्राधान्य दिलं. सॉफ्टवेअर कधी खरेदी करणार आणि काँट्रॅक्ट कधी निघणार एवढीच त्यांना चिंता लागलेली होती. यावरून कोणाला जनतेच्या प्रश्नांची आस आहे आणि कोणाला फक्त आपली कंपनी वाढविण्याचा हव्यास आहे’, असा घणाघाती आरोप कोल्हेनी आढळराव पाटलांवर केला होता.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol : पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याला प्राधान्य असेल, मुरलीधर अण्णांचा विश्वास

Narendra Modi : शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ, नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल

Vijay Shivtare : सुनेत्रा पवारांना फक्त उमेदवारी मिळाल्यावर किती बदल झाला, खासदार झाल्यावर तर काय होईल?