मुंबईत महायुतीचे 150 नगरसेवक निवडून येतील आणि त्यात रिपब्लिकन पक्षाचे 15 नगरसेवक असतील – आठवले

मुंबई – रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेशचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर बांद्रा येथील रंगशारदा सभागृह येथे पार पडले. केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) आणि खासदार राहुल शेवाळे (Rahul Shevale) यांचे  प्रमुख मार्गदर्शन या प्रशिक्षण शिबिरास लाभले. मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता उलथवून लावणार. भाजप शीवसेना  रिपाइं महायुतीचे 150 नगरसेवक निवडून आणणार आर पी आय चे त्यात 15 तरी नगरसेवक निवडून आलेले असावेत यासाठीच रिपब्लिकन कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर ठेवण्यात आले आहे.  आगामी निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागण्याचे  आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

यावेळी सौ. सीमाताई आठवले,रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजभाऊ सरवदे,राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, सरचिटणीस विवेक पवार; स्वगताध्यक्ष साधू कटके,सुरेश बारशिंग,अमित तांबे आदी अनेक उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत मुंबईत 6 पैकी एक ही  महाविकास आघाडीचा उमेदवार निवडुन येणार  नाही  यासाठी महायुती च्या कार्यकर्त्यांनी काम करावे. भाजप सोबत एकनाथ शिंदे यांची शिवसेना  आणी राष्ट्रवादी काँग्रेस चे अजित पवार हे आल्याने महायुती ची ताकद अधिक वाढली आहे.महायुतीत गर्दी झाली आहे त्यात रिपाइं चे काय होणार असे विचारत रिपब्लिकन पक्षाचे अस्तित्व स्वतंत्र आणि मजबूत ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या भागात जनसेवा करूनआपली ओळख निर्माण करावी. आगामी लोकसभा  निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वात 350 पेक्षा जास्त खासदार निवडुन आणून पुन्हा एनडीए सत्तेत  येईल. महराष्ट्रात महायुतीला निवडून आणण्यासाठी मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती ची सत्ता आणण्यासाठी रिपाइं कार्यकर्त्यांनी कामाला लागावे तसेच रिपाइंच्या उमेदवारांना निवडुन आणण्यासाठी मित्रपक्षाने ही  रिपाइं उमेदवारांना मतदान  केले पाहिजे असे मत रामदास आठवले यांचे यावेळी व्यक्त केले.