SRH VS RCB | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रचला इतिहास, आयपीएलमध्ये हा पराक्रम करणारा दुसरा संघ ठरला

आयपीएल 2024 चा 41 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात(SRH VS RCB)  झाला. हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. हा सामना सुरू होताच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एक विशेष कामगिरी केली. आयपीएलमध्ये 250 सामने खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा दुसरा संघ ठरला आहे.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्धचा सामना हा आयपीएलच्या इतिहासातील रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 250 वा सामना (SRH VS RCB) होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएलच्या इतिहासात 250 सामने खेळणारा दुसरा संघ ठरला आहे. याआधी केवळ मुंबई इंडियन्स संघाने ही कामगिरी केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला अद्याप आयपीएलचे एकही विजेतेपद जिंकता आलेले नाही.

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे संघ
मुंबई इंडियन्स – 255 सामने
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- 250 सामने
दिल्ली कॅपिटल्स – 247 सामने
कोलकाता नाइट रायडर्स – 244 सामने
पंजाब किंग्ज – 240 सामने

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | मोहोळ प्रचंड मताने निवडून येतील, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

Shivajirao Adhalarao Patil | राऊतांसारखी कोल्हेंनी सकाळी उठून काहीही बडबड करू नये, आढळरावांनी का साधला निशाणा?

Amol Kolhe | केंद्रातील सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेष, अमोल कोल्हेंचा सूतोवाच