राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापुरात ‘या’ तारखेला होणार सभा

मुंबई- राज्यातील भाजप-शिंदे सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अनेक आमदार पक्षातून बाहेर पडले व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला. या दौऱ्यांना मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबत असल्याचे दिसून येत आहे. पक्षाचे बांधणी करण्याकरिता आणि कार्यकर्त्यांमध्ये चेतना निर्माण करण्याकरिता महाराष्ट्रात आणखी दौरे आखण्यात येणार आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मतदार आणि पक्षाच्या निष्ठावंतांशी सभेच्या माध्यमातून पवार संवाद साधत असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh tapase) यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार  यांच्या सभेला महाराष्ट्रात (Sharad Pawar Meeting In Kolhapur) चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे त्यांच्या सभेची कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. शरद पवार यांची पुढील सभा कोल्हापुरात 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. या सभेला प्रामुख्याने छत्रपती शाहू महाराज उपस्थित राहणार आहेत. या सभेनंतर जळगाव आणि पुण्यामध्ये देखील सभा होणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.

महेश तपासे पुढे बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस मधील काही आमदारांनी विचारधारे विरोधात असलेल्या पक्षांसोबत जाऊन मंत्रीपदाची शपथ घेतली. ज्या मंत्र्यांनी पक्षाविरोधात जाऊन शपथ घेतली त्यांचा पक्षाशी काही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विचारधारेवर चालणारा पक्ष आहे व त्यासोबत तडजोड करणार नाही असे पवार साहेबांनी ५ जुलै रोजी झालेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभेत स्पष्ट केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचार धारा धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि समतावादी आहे. इंडिया आघाडीमध्ये असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सोबत तसेच भाजप विरोधी आहे. आम्ही आगामी निवडणुका एकत्र लढणार आहोत.

शरद पवार यांची सभेकरिता कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे 8 जुलै आणि त्यानंतर 17 ऑगस्ट रोजी बीड येथे शरद पवार साहेबांची सभा पार पडली. या दोन्हीही ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सभेला लाभला होता. त्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर येथे 25 ऑगस्ट रोजी दसरा मैदान येथे पवार साहेबांची सभा होणार आहे. ही सभा ऐतिहासिक असणार आहे. या सभेचे अध्यक्षपद छत्रपती शाहू महाराज हे भूषवणार आहे. या सभेला प्रमुख मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार  करणार आहे. या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे तसेच पक्षाचे कार्यकर्ते तथा विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित असणार आहे. पवार साहेबांना म्हणणारा वर्ग संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे.

कोल्हापूरच्या सभेनंतर शरद पवार साहेबांची सभा जळगाव त्यानंतर पुणे जिल्ह्यात होणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती आपल्याला वेळोवेळी देण्यातच येईल असे देखील महेश तपासे यांनी म्हटले आहे

जे लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेले ते केंद्रीय यंत्रणेच्या कारवाईला घाबरून सोडून गेले असे पुण्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शरद पवार साहेबांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भविष्यातील मार्ग या माध्यमातून पोहोचला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मार्ग समतेचा आहे. या देशाचं संविधान वाचावा या मार्गाचा आहे. केंद्र सरकारची एकाधिकारशाई ज्या प्रमाणात सुरू आहे त्या विरोधात आहे. असे देखील महेश तपासे यांनी म्हटले.

गेल्या काही दिवसापासून कांद्याचे प्रश्न चिघळला असून कांदा निर्यातीवर 40% निर्यात शुल्क केंद्र सरकारने लादले. त्यामुळे उत्पादकांवर आर्थिक संकट निर्माण झाले राष्ट्रवादी काँग्रेस व पवार साहेब हे नेहमीच शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणारे असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा जाहीर केला.

तीन-चार महिने कांदा खाऊ नका असा सल्ला देणारे मंत्रीही विद्यमान सरकार मध्ये आहेत अशी खंत महेश तपासे यांनी व्यक्त केली.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ₹2410 प्रतिक्विंटल कांदा खरेदी दर हा अपुरा असल्याची खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते तपासे यांनी केली. अडचणीच्या काळात शेतकऱ्याला चार हजार रुपये प्रति क्विंटल द्यायला हवे होते अशी मागणी तपासे यांनी पुढे केली.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नसंदर्भातील श्रेय केंद्रातील भाजपला घ्यायचं होतं त्यामुळेच त्यांनी जपानमध्ये असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भातील माहिती अगोदर देण्यात आले नंतर फडणवीस यांनी ट्विट करत माहिती दिली. त्यानंतर राज्यातील मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामुळे या सरकारमध्ये श्रेय वादाची लढाई सुरू असल्याची खोचक टीका महेश तपासे यांनी केली.