Archana Patil | अर्चना पाटील यांच्यासाठी पंतप्रधान मोदी धाराशिवमध्ये येणार, ‘या’ दिवशी होणार प्रचार सभा

Archana Patil | राज्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्यात मतदान होत असलेल्या मतदार संघातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. तिसऱ्या टप्यात मतदान असलेल्या लोकसभा मतदार संघाकडे आता राष्ट्रीय नेत्यांचे लक्ष लागले असून या टप्प्यात माराठवाड्यातील फक्त धाराशिव या एकाच मतदारसंघाचा समावेश आहे. महायुतीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वाट्याला आलेल्या या लोकसभा मतदारसंघात लक्षवेधी लढत  होत आहे. या मतदारसंघात  महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची सभा 30 एप्रिल रोजी होणार आहे.

लोकसभेच्या दुसऱ्या टप्यात माराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि नांदेड या मतदारसंघांचा समावेश आहे. तर तिसऱ्या टप्यात मराठवाड्यातून फक्त धाराशिव मध्ये मतदान होणार आहे. तर उर्वरित बीड, जालना, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये चौथ्या टप्यात मतदान आहे.

धारशिव मध्येराष्ट्रवादी कॉँग्रेस, महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील आहेत,  त्यांच्या विरुद्ध विद्यमान खासदार ओमाराजे निंबाळकर हे ठाकरे गटांकडून मैदानात आहेत. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडीतून अर्चना पाटील यांचे पारडे या निवडणूकीत जड झाल्याचे दिसते आहे, त्यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 एप्रिल रोजीसकाळी 11 वा, धारशिव मध्ये तुळजापूर रोड वरील मैदानावर प्रचार सभा घेणार असल्याने त्याचा फायदा अर्चना पाटील यांना निश्चित होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Jay Pawar | संसदरत्न फार मोठा पुरस्कार नाही; जय पवार यांची पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंवर थेट टीका

Ajit Pawar | ‘बायको म्हणाली, अहो हे काम करुन द्या, तर करावेच लागणार, नाहीतर…’; अजित पवारांचे मिश्किल वक्तव्य

Pune LokSabha | शिंदे आणि अजित पवारांची जी उंची होती, ती आज राहिली नाही; काँग्रेसच्या नेत्याने जखमेवर चोळले मीठ